हातावर पोट असणाऱ्यांची जगण्यासाठीची धडपड सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:50 PM2020-03-30T19:50:15+5:302020-03-30T19:50:28+5:30
कोरोनाचा संसर्ग ठाण्यात एकीकडे वाढत जात आहे, शहरात आजच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
- अजित मांडके - विशाल हळदे
ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 21 दिवसांचे लॉक डाऊन घोषीत करण्यात आले. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. मात्र जगायचं असेल तर त्यासाठी या लॉकडाऊनच्या काळातही हातावरचे पोट असणा:यांची धावपळ सुरुच असल्याचे चित्र शहरात अनेक भागात दिसत आहे. कोणी रेल्वे ट्रॅकवरुन घरातील रेशन आणण्यासाठी धावतोय तर कोणी घरातील चुल पेटली तर खाणो मिळेल या आशेने गॅसच्या रांगेत तासंन तास उभा राहतोयं.
कोरोनाचा संसर्ग ठाण्यात एकीकडे वाढत जात आहे, शहरात आजच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बंद असल्याने अत्यावश्यक सेवांवरही ताण येत आहे, किराणा दुकानातील सामानही संपत आले आहे, काही दुकानातून महाग सामना विकले जात आहे. जे प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असे नाही. त्यामुळे लॉकडाऊन असतांनाही हातावरचे पोट असणा:यांची जगण्यासाठीची धावपळ ठाण्याच्या विविध भागात सुरु असल्याचे दिसत आहे. रोज कमवायचे रोज खायाचे अशी अनेक कुटुंबे ठाण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे महिना भराचा किराणा तरी कसा भरायचा असा पेच त्यांच्यापुढे आहे. आता तर घरातील किराणाही मिळने दुरापस्थ होऊन बसलयं, त्यामुळे जगण्याची धडपड त्यांची सुरु आहे. कोणी यासाठीच घरापासून तीन ते चार किमी पायी चालून घरातील किराणा आण्यासाठी उन्हा तान्हाची तमा न बाळगता, पायी चटके सहन करुन रेल्वे ट्रॅक तर कोणी रस्त्यावरुन पायपीट करतांना दिसत आहे. अशीच परिस्थिती ठाण्यातील अनेक भागात दिसत आहे.
मुंब्रा रेतीबंदर मधील काही महिला अशाच पध्दतीने भर उन्हात घरातील मुलांसाठी दोन घास मिळावेत यासाठी कळवा नाक्यार्पयत रेल्वे ट्रॅकवरुन डोक्यावरुन किराणा माल घेऊन जात होते. ना जीवाची पर्वा ना कोरोनाची भिती, अशाच मानसिकतेत त्या दिसत होत्या. आमच्या घरच्यांची पोटं भरणो हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे या महिला सांगत होत्या. तर मुलुंड ते दिवा असा रेल्वे ट्रॅकने एका वृध्दाचा असाच प्रवास येथे दिसत होते. डोक्यावर किराणा सामान घेऊन हा वृध्द देखील जगण्यासाठीची दडपड कशी असते, हे दाखवून देत होता. दुसरीकडे, घरात चुल पेटली तरच घरच्यांना खायला मिळणार आहे. याच आशेवर गॅस एजेन्सीने देखील घर्पयत गॅसचा बाटला पुरवठा करणो बंद केल्याने, डोक्यावर तोच बाटला घेऊन जाऊन एक ते तीन कीमीचा पायी प्रवास करुन अनेक जण, तासन तास गॅसच्या रांगेत उभ राहत आहेत. कोणाकडे रेशन नाही, तर कोणाकडे गॅस नाही, अशीच काहीशी परिस्थिती सध्या अनेक भागात दिसत आहे. कोरोनाची भिती ही प्रत्येकाच्या मनात आहे, परंतु या सर्वाचीच जगण्यासाठीची धडपड ही सुरुच आहे.