अतिक्रमणांवर पालिकेचा पुन्हा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:43 AM2017-11-08T01:43:51+5:302017-11-08T01:43:59+5:30
ठाणे महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार उथळसर प्रभाग समिती अंतर्गत दोन दिवसापासून या भागात रस्ते, फुटपाथ अडविणाºया फेरीवाले आणि अतिक्रमण करणाºयांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
सोमवारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. रस्ते, फुटपाथ पादचाºयांसाठी मोकळे करा अशा सुचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत अधिकाºयांना केल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून या भागात कारवाई सुरू झाली आहे. सरस्वती स्कूल जवळील हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच महापालिका सर्कल, सरोवर दर्शन येथील रस्त्यावर फुल विक्री करणाºया विक्रेत्यांचेही सामान जप्त करून येथील फेरीवाले हटविण्यात आले. या कारवाईत ८ हातगाड्या, २ स्टॉल्स, ३ टेबल, ४ खुर्च्या जप्त करण्यात आले. तर ४ स्टॉल तोडले. तसेच मंगळवारीदेखील ती सुरुच होती. सकाळी ११ वाजल्यापासून अतिक्रमण विभागामार्फत फ्लॉवर व्हॅली ते नितिन कंपनी सेवा रस्त्या लगत अनधिकृत गॅरेज, वाढीव बांधकामांवर हातोडा टाकण्यात आल्याची माहिती पाटोळे यांनी दिली.