धामणकरनाका उड्डाणपुलावरील खड्ड्यांकडे मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:19+5:302021-03-25T04:38:19+5:30
भिवंडी : शहरातील धामणकरनाका उड्डाण पुलाच्या चढ उताराच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा ...
भिवंडी : शहरातील धामणकरनाका उड्डाण पुलाच्या चढ उताराच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, मनपा प्रशासनाचे या खड्ड्यांकडे पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहरातील सर्वात पहिला धामणकरनाका उड्डाण पूल मेट्रो मार्गामुळे तोडण्यात येणार असल्याचे समजते. त्यातच या उड्डाण पुलापर्यंत मेट्रोचे कामदेखील येऊन ठेपले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे अंजुरफाटा ते धामणकरनाका रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालकांना अगोदरच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी वाहनचालक आपली वाहने उड्डाण पुलावरून नेतात. मात्र, या उड्डाण पुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारात आहेत. दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी डांबरीकरण व रस्ते दुरुस्ती होत असतांनादेखील धामणकरनाका उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांकडे मनपा प्रशासन डोळेझाक का करते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
===Photopath===
240321\20210206_113218.jpg
===Caption===
धामणकर नाका उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष