नगरसेविका माधुरी काळे यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:05 AM2018-02-06T03:05:24+5:302018-02-06T03:05:27+5:30

सहकारी नगरसेविकेला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पूर्वेतील नगरसेविका माधुरी काळे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Corporator Madhuri Kale was granted bail | नगरसेविका माधुरी काळे यांना जामीन

नगरसेविका माधुरी काळे यांना जामीन

googlenewsNext

कल्याण : सहकारी नगरसेविकेला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पूर्वेतील नगरसेविका माधुरी काळे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर झालेल्या काळे यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.
आमदार निधीतून झालेल्या विकासकामांच्या बॅनरवरून शिवसेना नगरसेविका माधुरी काळे आणि शीतल मंढारी यांच्यात आॅक्टोबरमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही नगरसेविकांनी एकमेकींविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.
मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी काळे यांनी जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, आता त्यांना जामीन मिळाला आहे.

Web Title: Corporator Madhuri Kale was granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.