नगरसेविका मारहाणीचे पडसाद महापौर दालनातही
By admin | Published: May 30, 2017 05:35 AM2017-05-30T05:35:54+5:302017-05-30T05:35:54+5:30
भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रतिभा पाटील आणि त्यांच्या मुलास भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकांकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रतिभा पाटील आणि त्यांच्या मुलास भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकांकडून मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. याचेच पडसाद सोमवारी महापौर दालनातही उमटल्याने पोलिसांनी पालिकेत धाव घेतली.
अण्णानगर समाजमंदिर नूतनीकरण भूमिपूजनावेळी भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील या कामच करत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी आ. नरेंद्र मेहता यांच्याकडे केली. त्यावरून पाटील यांचा मुलगा शुभम तसेच भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी वासुदेव हरिजन यांच्यातील बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. शुभम याला लाथाबुककयांनी मारहाण केली, तर नगरसेविका पाटील यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलिसांत एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या.
सोमवारी प्रतिभा पाटील यांनी महापौर गीता जैन यांच्याकडे घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्या वेळी अण्णानगरमधील वासुदेव याच्या समर्थक तरुणाने पुन्हा अरेरावी केल्याने महापौर दालनात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी महापौर दालनात धाव घेतली. घटनेबाबत महापौर जैन, गटनेते शरद पाटील, नगरसेविका प्रतिभा पाटील आणि कांबळे यांच्यात चर्चा झाली.