नगरसेविकेच्या पतीला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2016 03:49 AM2016-01-03T03:49:46+5:302016-01-03T03:49:46+5:30
सोनारपाडा गावात हवेत गोळीबार करून भांडण सोडवणे शिवसेना नगरसेविकेच्या पतीला महागात पडले. या प्रकरणी त्याला पोलीस कोठीडीची हवा खावी लागली आहे. नववर्षाच्या पहिल्याच
डोंबिवली : सोनारपाडा गावात हवेत गोळीबार करून भांडण सोडवणे शिवसेना नगरसेविकेच्या पतीला महागात पडले. या प्रकरणी त्याला पोलीस कोठीडीची हवा खावी लागली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मानपाडा हद्दीतील जी.आर. पाटील कॉलेजच्या पटांगणात रात्री ही घटना घडली. कॉलेजच्या पटांगणात रामलीला आयोजित केली होती, तेथे आयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नगरसेविका प्रमिला पाटील यांचे पती मुकेश पाटील यांना आमंत्रित केले होते. कार्यक्र म सुरू असताना काही तरु णांनी दंगामस्ती सुरू केली. मुकेश पाटील यांच्यासोबत आलेले मेघलाल साहू यांचा नाचताना विनोद पाटील, स्वप्नील केणी आणि राकेश म्हात्रे यांना धक्का लागला. त्यावरून ते तिघे आणि मेघलाल यांच्यात बाचाबाची झाली. नंतर, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. ही भांडणे सोडविण्यासाठी मुकेश पाटील मध्ये पडले. तेव्हा मोठा जमाव पाटील यांच्या अंगावर चाल करून आला. तरीही भांडणे थांबली नाहीत. उलट, त्या चौघांच्या भांडणात मुकेश पाटील यांनाही मार बसला. त्यामुळे मुकेश यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्याकडील परवानाधारी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्यात कोणीही जखमी झाले नसले, तरी गोंधळ उडाला. त्यानंतर, मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या चौकडीला ताब्यात घेतले. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून विनोद पाटील, राकेश म्हात्रे आणि स्वप्नील केणी यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून मुकेश पाटील आणि मेघालाल साहू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी सांगितले. मुकेश पाटील यांच्याजवळील बंदूक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. मुकेश पाटील यांच्यावर यापूर्वीही काही गुन्ह्याची नोंद असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)