जलविद्युत प्रकल्पाच्या सांमजस्य करारावर सही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:21 AM2017-08-02T02:21:22+5:302017-08-02T02:21:22+5:30
अपारंपारिक उर्जा संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे उभारण्यात येणाºया प्रकल्पाचा आणि ठाणे पालिकेच्या पाणीवितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी,
ठाणे : अपारंपारिक उर्जा संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे उभारण्यात येणाºया प्रकल्पाचा आणि ठाणे पालिकेच्या पाणीवितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी, निगा व देखभाल अशा दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर मंगळवारी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
सौर शहरीकरणातंर्गत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपारिक उर्जेच्या संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून पीपीपी तत्वावर निर्माण करण्यात येणाºया प्रकल्पाबाबत मंगळवारी ठाणे महानगरपालिका आणि मे. मार्सोल सोलर प्रा. लि. या कंपनीच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून ५५० चौरस मीटर जगातील सर्वात मोठी सौर उर्जा डिस्क बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी उर्जा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील विविध सेवांसाठी वापरण्यात येणार असून त्यामध्ये या प्रकल्पातील निर्माण होणाºयाा बाष्पाचा वापर करून नव्याने बनविण्यात येणाºया शवागृहामध्ये शीत यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी प्रकल्पाच्या सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे पालिका व मे. फ्लॅमिन्को या कंपनी दरम्यान हा करार करण्यात आला.