कृत्रिम तलावात केला भ्रष्टाचार - भाजपाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:29 AM2017-09-11T06:29:36+5:302017-09-11T06:29:42+5:30
मागील दीड ते दोन वर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भुयारी गटार योजना असो की गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारणे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आता, तर भ्रष्टाचार करणाºयांनी हद्द्च केली आहे.
बदलापूर : मागील दीड ते दोन वर्षात कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भुयारी गटार योजना असो की गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारणे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आता, तर भ्रष्टाचार करणाºयांनी हद्द्च केली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराकरिता देवालाही सोडलेले नाही असा गंभीर आरोप भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे.
बदलापूर नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत एकूण तीन कृत्रिम तलाव उभारले. त्यानुसार उल्हास नदीवरील कृत्रिम तलावासाठी चार लाख ९९ हजार, शिरगाव व वडाई गार्डन येथील कृत्रिम तलावासाठी प्रत्येकी दोन लाख ९९ हजार खर्चाच्या निविदा मंजूर केल्या. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणाºयांनी देवालाही सोडत नाही? असा आरोप शिंदे यांनी केला. प्रभाग क्र मांंक ३० मध्ये सूर्यविहार सोसायटी येथे स्वखर्चाने कृत्रिम तलाव उभारले. त्याकरिता केवळ दोन हजार रु पये इतका खर्च आला तर पालिकेने कृत्रिम तलावाची निविदा ही ९.९ टक्के वाढीव दराने मंजूर केली. पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारावर लाखोंची मेहेरबानी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येक वर्षी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभरण्यात येतात. त्या तलाव निर्मितीसाठी वापरलेले जाणारे साहित्य ताडपत्री, रेती , सिमेंटच्या गोण्या कुठे जातात. जर आपण कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याºया कंत्राटदारास या कृत्रिम तलावांचे बिल दिले असेल तर हे साहित्य नगरपालिकेची मालमत्ता आहे. मग हे साहित्य गेले कुठे? याचाही खुलासा प्रशासनाने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कंत्राटदारास रक्कम देऊ नये अशी भाजपाची मागणी असल्याचेही त्यांनी
सांगितले.
नगरसेवक सुरवळांचे जातीने लक्ष
तीन तलावांपैकी नगरसेवक अरूण सुरवळ यांच्या प्रभागात असलेल्या कृत्रिम तलावाची परिस्थिती व सुविधा चांगल्या होत्या.
त्यामुळे या प्रभागातील गणेश भक्तांना कोणताही त्रास झाला नाही.
परंतु त्याचे श्रेय हे पालिकेचे नसून ते व्यक्तिश: सुरवळ यांचे आहे. त्याठिकाणी सुरवळ यांनी स्वत: लक्ष दिल्याने ते शक्य झाले, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.