एमएमआरडीएच्या रेंटलच्या घरात भ्रष्टाचार, ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक, चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:50 PM2022-01-13T16:50:14+5:302022-01-13T16:51:04+5:30
Thane Municipal Corporation: दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ठाणे - दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पालिका अधिका-यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्याचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून संबंधितांवर कारवाई करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. दुसरीकडे याच प्रकरणावरुन कॉंग्रेसने थेट न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. त्यातही या हे प्रकरण दाबण्यासाठी कोकणातील दोन मंत्र्यांचा दबाव येत असल्याचा आरोप शहर कॉंग्रेसने केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्नात एमएमआरडीएने भाडेतत्वावरील योजनेंतर्गंत सदनिकांची उभारणी केली असून या सदनिका एमएमआरडीएने पालिकेकडे वर्ग केल्या आहेत. मात्र दिवा भागातील सदनिकांच्या वाटपात घोटळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी केला आहे. दिवा भागातील सदनिका प्रत्यक्षात पी.ए.पी.च्या लाभाथ्र्याना मिळणो क्र मप्राप्त असतानाही त्या सदनिकांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सदनिका देताना खोटी दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे, चाव्यांचा घोळ मोठया प्रमाणात झालेला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणा:या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा तसेच डायघर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपुर्वी हा गुन्हा दाखल झाला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून त्यात संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावर येत्या सोमवापर्यंत निर्णय घेतला नाहीतर महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सर्व्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करीत केवळ कोकणातील दोन मंत्र्यांमुळे या तपासात विघ्न येत असल्याचा धक्कादायक आरोप यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तसेच पालिकेतील तीन पदाधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असल्याने या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु ही कारवाई न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी मुक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.