प्रमुख उमेदवारांचा प्रचार खर्च १५ लाखांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:36 AM2019-04-19T05:36:38+5:302019-04-19T05:37:23+5:30
उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे.
ठाणे : उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च मुख्यत: रॅली आणि चौकसभांवर झाला आहे. अपक्ष उमेदवारांकडून बऱ्याच वेळा खर्च सादर केला जात नाही. त्यामुळे त्यांना खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सांगावे लागत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ येतात. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आतापर्यंत साधारणत: १० ते १५ लाखांपर्यंत खर्च केला आहे. यामध्ये चौकसभा, रॅली, कार्यकर्त्यांना वाटलेले झेंडे, चिन्हे, टोप्या आदी प्रचार साहित्यावर केलेला खर्च आणि प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांचा खर्चही दाखवला जात आहे. त्या तुलनेत इतर पक्षांच्या उमेदवारांनी सात ते आठ, तर अपक्ष उमेदवारांनी एक ते दीड लाखापर्यंत खर्च केल्याचा तपशील सादर केला आहे.
>सहा पथके तैनात
ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाºया विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी सहा पथके आहेत. त्यात्या पथकांद्वारे उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवले जात आहे. रॅली अथवा इतर प्रचार कार्यक्रमातील खर्चाचा अंदाज ही पथके नोंदवत आहेत..खर्चाचा तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावली जाणार आहे. नोटीसीला उत्तर न दिल्यास तीन वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.