स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी चक्क नगरसेवकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:38 AM2018-01-18T00:38:05+5:302018-01-18T00:38:19+5:30

शहर स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातून शहरांची तपासणी केली जात होती. आता स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे पारितोषिक मिळणार असल्याने नगरसेवक कामाला लागले आहेत.

Councilors took the initiative for clean ward competition | स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी चक्क नगरसेवकांनी घेतला पुढाकार

स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी चक्क नगरसेवकांनी घेतला पुढाकार

Next

बदलापूर : शहर स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातून शहरांची तपासणी केली जात होती. आता स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे पारितोषिक मिळणार असल्याने नगरसेवक कामाला लागले आहेत. आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी नगरसेवकांनी प्रभागात उपक्रम सुरू केले आहेत. तसेच प्रभागात कचरा राहणार नाही, याची दक्षता घेत आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्र म राबवल्यानंतर दोन वर्षांपासून स्वच्छ शहर स्पर्धा राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षापासून नगरपालिका शहरांनाही यात सामावून घेण्यात आले. यंदाच्या वर्षात स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासह स्वच्छ प्रभाग स्पर्धाही होणार आहे. शहरातील स्वच्छ प्रभागाला ३० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि बक्षीस मिळवण्यासाठी अनेक नगरसेवक कामाला लागले आहेत. त्यासाठी अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात ओला-सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचºयाची प्रभागातच विल्हेवाट लावणे, त्यासाठी खड्डे खोदणे, महत्त्वाचे चौक स्वच्छ करणे, कचरा प्रक्रि येचे छोटेछोटे प्रकल्प प्रभागातच करणे, अशा कामांना सुरुवात केली आहे. याकरिता आरोग्य विभागाची मदत घेतली जात आहे.
ही स्पर्धा जिंकण्यासाठी मालमत्ताकराचा अधिकाधिक भरणा करण्यासाठीही नगरसेवक काळजी घेत आहेत. अनेक नगरसेवकांनी काही इमारती मिळून मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी श्रमदानाचे गुण अधिक मिळवण्यासाठी मकरसंक्र ांत आणि प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी श्रमदान कार्यक्र म घेणार आहेत.

Web Title: Councilors took the initiative for clean ward competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.