गॅस सिलिंडरसाठी आता मोजा ८६५ रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:47+5:302021-08-20T04:46:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच भडका उडाला आहे. आता त्यात स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच भडका उडाला आहे. आता त्यात स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य परिवारास गॅसचा वापर करणे आवाक्याच्या बाहेर जात आहे. सतत १५ दिवसांच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका उडाला आहे. आताही ८६० ते ८६५ रुपयांना गॅस सिलिंडर मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत १५० ते १५५ रुपयांनी गॅसचे दर वाढले आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राज्यकर्ते जनयात्रा करून या महागाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता सरपणाच्या पर्यायी वापराच्या तयारीत आहेत. महिला गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत.
--------
१) आठ महिन्यांत १५० रुपयांची वाढ
* महिना दरवाढ (रुपयांत)
१) जानेवारी - ६९४
२) फेब्रुवारी - ७६९
३) मार्च - ९१९
४) एप्रिल - ८०९
५) मे - ८०९
६) जून - ८०९
७) जुलै- ८३४.५०
८) ऑगस्ट - ८६५
-------------