येऊरसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे, हरीण, माकडांची आजरात्री गणना!

By सुरेश लोखंडे | Published: May 5, 2023 04:52 PM2023-05-05T16:52:43+5:302023-05-05T16:52:54+5:30

ठाणे : येथून जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह येऊर जंगलात मनसोक्त मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांसह, हरीण, सांबर, माकड, मोर, ...

Counting of Leopards, Deer, Monkeys in Sanjay Gandhi National Park with Yeur! | येऊरसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे, हरीण, माकडांची आजरात्री गणना!

येऊरसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे, हरीण, माकडांची आजरात्री गणना!

googlenewsNext

ठाणे : येथून जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह येऊर जंगलात मनसोक्त मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांसह, हरीण, सांबर, माकड, मोर, लांडोर, घोबड, घार, कोल्हे, काळवीट, रानडुक्कर आदी विविध पक्षी, प्राण्यांची गणना शुक्रवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री जंगलात करण्यात येत आहे.

जंगलातील पाणवठे, झरे, पाणथळ, पाण्याचे डोह, डबके, तलाव आदी ठिकाणी हे वन्य प्राणी, पक्षी रात्री पाणी पिण्यासाठी येतात. त्यादरम्यान बांधलेल्या मचाणवर बसून अधिकारी,कर्मचारी या प्राण्यांची, पक्षांची गणनाकरणार आहे. यासाठी येऊरच्या जंगलात ३६ अधिकार्यांच्या निगराणीत ठिकाणी मचाण बांधले आहेत.

या वन्य प्राण्यांची, पक्षांची गणना रात्री पौर्णिमेच्या चांदण्याच्या प्रखर प्रकाशात शुक्रवारी करण्याचे येऊर वनपरिक्षेत्राने हाती घेतली आहे. झाडाझुडपात, उंच झाडाच्या शेंड्यावर, निर्जनस्थळी वनविभागाने ३६ अधिकारी,कर्चार्यांचशसाठी मचाण बांधले आहेत. त्यावर बसून  वनाधिकारी, कर्मचारी, प्राणीप्रेमी संस्थाचे प्रतिनिधी दुर्बिनच्या सहाय्याने या प्राण्यांच्या हालचाली टिपून त्यांची नोंद घेणार आहेत.

ठाणे शहरास लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील या येऊरच्या जंगलात वन्य पशूपक्षांची गणना हाती घेतली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या पाणवठ्यांवर ३६ वनाधिकारी, कर्मचारी, वनरक्षक या प्राण्याची नोंद मचाणावर बसून घेणार असल्याच्या वृत्तास येऊर परीक्षेत्र वनाधिकारी गणेश सोनटक्के यांनी दुजोरा दिला आहे.  या जंगलामधील वार्षिक प्राणी, पक्षी  गणना केली जात आहे.

दिवसभर कडकडीत उन्हात दडून बसलेले व तहाणेने व्याकूळ वन्य प्राणी, पक्षी रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात.वैशाखाच्या या कडकडीत उन्हाळ्यात ते पाण्यावाचून जास्तकाळ राहू शकत नाही. त्यांना पाहाणे व त्यांच्या हालचाली टिपणे 'बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री सहज शक्य आहे. त्यामुळे वन विभाग या दिवशी या वन्य प्राण्या दिवसा आणि पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाºया वन्य प्राण्यांची गणना २४ तासांच्या दरम्यान करतात. काही स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि वन कर्मचारी संपूर्ण रात्र जंगलातील अनेक पाण्याच्या ठिकाणी मचाणवर बसून रात्रभर प्राणी मोजतात.

येऊरच्या जंगलासह घोडबंदर, चेणा नदी, नागला बंदर परिसरातील पाणवठे व पाणथळीच्या जागांवरील मचाणावर हे ३६ अधिकारी, कर्मचारी बसून प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहे.

पाणथळीच्या जागा - व्यक्ती

करंदीचे पाणी - ३
वळकुंडीचे पाणी - ३
टाकाचा नाला -४
आंब्याचे पाणी -४
चांभारखोंडा नाला -४
चिखलाचे पाणी - ३
हुमायुन बंधारा - ४
माकडाचे पाणी -४
जांभळीचे पाणी -३
करवेलचे पाणी -३
तलवळीचे पाणी -३
कोरलाईचे पाणी - ३

Web Title: Counting of Leopards, Deer, Monkeys in Sanjay Gandhi National Park with Yeur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.