आटगाव रेल्वे स्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कपलिंग तुटली, मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:24 PM2022-08-14T13:24:00+5:302022-08-14T13:25:40+5:30
शाम धुमाळ कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली ...
शाम धुमाळ
कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर 11 वाजता मालगाडी दुरुस्त झाली व कसारा कडे येणारी वाहतुक् सुरु झाली . मात्र त्यानंतर अवघ्या 10 मिनटात कसारा कडे निघालेल्या भागलपूर एक्सप्रेसने आटगाव स्टेशन सोडल्यावर किलोमीटर क्रमांक 92 जवळ अचानक इंजिन पासून तिसऱ्या बोगी चे कपलिंग तुटून एक्सप्रेसचे काही डबे आटगाव दिशेने थांबले तर 3 डब्बे व इंजिन कसारा दिशे कडे थांबले. या प्रसंगामुळे भागलपूर एक्सप्रेस मधील शेकडो प्रवासी भयभीत झाले होते. काही दुर्घटना झाली म्हणून काही प्रवासी गाडीतून खाली उतरले होते. दरम्यान दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वेच्या कसारा येथील कर्मचाऱ्यांनी जाऊन भागलपूर एक्सप्रेसचे कपलिंग जोडले व लोकमान्य टिळक टर्मिनस मुबई भागलपूर एक्सप्रेस दुपारी 12,45 वाजता कसाऱ्याकडे रवाना केली.
आत्याधुनिक यंत्रणे मुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान गाडी भरधाव वेगात असताना भागलपूर एक्सप्रेस चे 3 डब्ब्या पासून चे कपलिंग तुटून् डबे वेगवेगळे झाले होते.परंतु हे डबे वेगळे झाल्यानंतर रुळावरून खाली न घसरता तात्काळ जागीच थांबले होते. मध्य रेल्वे च्या आधुनिक यंत्रणे द्वारे अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे यात कपलिंग तुटून काही घटना घडू नये म्हणून कपलिंग लगत असलेल्या एअर व्हॅक्युम प्रेशर पाईपला मेल एक्सप्रेस च्या सर्व डब्ब्यां च्या ब्रेक शी संलग्न केले आहे. जेव्हा एखाद्या मेल एक्स्प्रेस चे कपलिंग तुटते तेव्हा ह्या एअर प्रेशर पाईप मधील हवा लगेचच पूर्ण पणे लिक होते व ती हवा लिक झाली की एक्सप्रेस चे डब्बे हळू हळू जागीच थांबले जातात. त्यामुळे कपलिंग जरी तुटली तरी डब्बे रुळावरून खाली घसरत तर नाहीच परंतु एकावर एक पण चढत नाहीत .
जर भागलपूर एक्सप्रेस च्या डब्ब्यांना प्रेशर पाईप ची सुविधा नसती तर डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असते किंवा एकावर एक चढले असते परिणमी मोठी दुर्घटना घडली असती.