कोर्टाची फाइट, बारमालक ‘टाइट’
By admin | Published: April 1, 2017 11:43 PM2017-04-01T23:43:19+5:302017-04-01T23:43:19+5:30
दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९०३ बार, पब बंद होणार आहेत. त्यांना सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे.
ठाणे : दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९०३ बार, पब बंद होणार आहेत. त्यांना सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे १०० टक्के महसुलावर परिणाम होणार आहे. उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यांतून मिळणाऱ्या महसुलावर त्याचा परिणाम होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक एन.एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्ह्यात कारवाई सुरू झाली
आहे. पण,ही कारवाई सुरू करण्यापूर्वीच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील काही बारमालक व वाइनशॉपमालकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. आता जिल्ह्यातील एकूण ९०३ दुकानांवर शासकीय सील ठोकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या उत्पन्नावर नव्हे, तर राज्याच्या महसुलावर परिणाम होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी क रताना अडथळे येण्याचे काही कारण नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे जाळे
मुंबई असो वा गुजरात व इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. या जिल्ह्यातून जवळपास पाच राष्ट्रीय, तर पाच राज्य महामार्गांचे जाळे पसरले असून यातील किती राज्य महामार्ग बंद होतील, हे संबंधित विभागच सांगू शकेल.पण, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा नक्की जिल्ह्यासह
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अपघात कमी होण्यास फायदा होईल, अशी माहिती
ठाणे शहर वाहतूक शाखेचे
पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. मात्र, या दारूबंदीचा फायदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नक्की होईल.त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयासह ग्रामीण भागात होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. असेही पालवे यांनी स्पष्ट केले. मिळणार किंवा कसे, याबाबतचे हे विषय वाहतूक विभागांतर्गत येत नसल्याने त्याबाबत बोलणे उचित नाही. (प्रतिनिधी)