वृक्षतोडप्रकरणी पालिका न्यायालयात जाणार? नौपाडा पोलिसात तक्रार, प्रशासन आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:41 AM2017-11-12T04:41:07+5:302017-11-12T04:41:14+5:30
रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
ठाणे : रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्र ार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन आणि संवर्धन कायदा १९७५ कलम ८ (१) नुसार तक्र ार दाखल करून घेण्यात आली आहे. तक्र ारीची हीच प्रत घेऊन आता ठाणे महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
ठाणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र मांक-१ आणि २ च्या मधोमध असलेली चार मोठी झाडे मुळासकट तोडल्याचा प्रकार ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ कारवाई करून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवून २४ तासांच्या आत यासंदर्भात खुलासा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर, आता नौपाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. परंतु, एवढ्यावर न थांबता आता हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी वृक्ष प्राधिकरण विभागाने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची जी प्रत ठाणे महापालिकेला दिली आहे, ती महापालिका कोर्टात सादर करणार आहे. वृक्षतोड करण्याचा अधिकार संबंधित विभागाला असल्याचा खुलासा रेल्वेने केला होता.
यापूर्वी का पाठवले प्रस्ताव
यापूर्वी रेल्वेने ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडे तोडण्याचे १० ते १५ प्रस्ताव महापालिकेकडे का पाठवले होते, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे.
याला जबाबदार ओव्हरहेड वायर विभाग आणि स्टेशन प्रबंधक यांना प्रतिवादी बनवणार आहेत.