कासकरसह चौघांना न्यायालयीन कोठडी, बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:13 AM2017-11-05T03:13:41+5:302017-11-05T03:13:53+5:30

खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह चौघांची शनिवारी ठाणे विशेष मकोका न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तसेच खंडणीच्या प्रकरणात एक ते दोन जणांना साक्षीदार करण्याचे काम सुरूअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Court quashed with Kaskar, boasting tribute to builder | कासकरसह चौघांना न्यायालयीन कोठडी, बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली खंडणी

कासकरसह चौघांना न्यायालयीन कोठडी, बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली खंडणी

googlenewsNext

ठाणे : खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह चौघांची शनिवारी ठाणे विशेष मकोका न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तसेच खंडणीच्या प्रकरणात एक ते दोन जणांना साक्षीदार करण्याचे काम सुरूअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज एजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना खंडणीविरोधी पथकाने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यांच्यावर खंडणीचे तीन गुन्हे दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
जवळपास एक महिना ते पोलीस कोठडीत होते. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासातून या आरोपींवर लावलेल्या गुन्ह्यांवर शिक्कामोर्तब झाल्याने मकोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. त्यानुसार, पहिल्यांदा चारही आरोपींना ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी ४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार, पुन्हा चारही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुन्हा अपयश
पोलिसांना पाहिजे असलेल्या शमी आणि गुड्डू या दोघांच्या मागावर ठाणे शहर पोलिसांचे पथक दुसºयांदा बिहारला गेले होते. त्या पथकाला त्यांना पकडण्यात अपयश आले. मात्र, शमीविरोधात पाटणा येथील पोलीस ठाण्यात मर्डरचा गुन्हा दाखल असून, तो त्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Web Title: Court quashed with Kaskar, boasting tribute to builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा