पुतणीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 10:14 PM2021-01-21T22:14:48+5:302021-01-21T22:17:53+5:30
अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते. हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्वत:च्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणेन्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिला दहाव्या मजल्यावरुन फेकून देऊन ठार मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत मारहाण करुन तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते.
हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पिडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरु असतांना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये आणि माथेरानमधील एका घरामध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पिडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. तिच्या तक्र ारीनंतर या नराधम चुलत्याविरुद्ध ६ जून २०१४ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला लगेचच अटक केली होती. तपासाअंती याप्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. बुधवारी या खटल्याची सुनावणी झाली. ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासाची आणि २२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वला मोहोळकर यांनी बाजू मांडली.