Coronavirus: कोविड रुग्णालयाचा कचरा रस्त्यावर; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 08:43 AM2020-07-07T08:43:42+5:302020-07-07T08:43:54+5:30
या कचऱ्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू असल्याने महापालिकेने सामान्यांच्या आरोग्यासाठी तातडीने तो कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
डोंबिवली: कोरोनासाठी जी रुग्णालये महापालिकेने निवडली आहेत त्या रुग्णालयातील रुग्णांचा उपचार दरम्यान होणार्या कचऱ्याची विल्हेवाट मात्र वेळीच न लावल्याने त्यातून उग्र दर्प पसरल्याची घटना रामनगरमध्ये स्वामी विवेकानन्द रस्त्यावर घडली आहे. सोमवार रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत तो कचरा रुग्णालयाने रस्त्यावर आणून टाकण्यात आल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
या कचऱ्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू असल्याने महापालिकेने सामान्यांच्या आरोग्यासाठी तातडीने तो कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्लास्टिकच्या गोण्या भरून कचरा असून महापालिका करतेय काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. रात्रभर कचरा पावसात भिजला असून सर्वत्र घाण पसरली आहे. रुग्णालय प्रशासन असे उघड्यावर कचरा कसा टाकू शकते? टाकला तरी महापालिका कचरा सफाई विभाग नेमकं काय करतोय? 12 तासांहून अधिक वेळ कोरोना रुग्णालयाचा कचरा रस्त्यावर पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तो कचरा तातडीने उचलला जावा, तसेच यापुढे अस रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत अशीही मागणी नागरिकांनी केली.