जव्हारमध्ये माकपचा धडक मोर्चा
By admin | Published: December 11, 2015 01:05 AM2015-12-11T01:05:03+5:302015-12-11T01:05:03+5:30
जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी, माकपाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सदस्य व पालघर जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या
जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी, माकपाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सदस्य व पालघर जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली गुरुवारी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जव्हार, मोखाडा, व विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यातील प्लॉट धारकांनी व दाव्यधारक प्लॉट, जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दि. १० डिसेंबर रोजी, मार्सवादी कामुनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जव्हार बस स्टोप, समोरील नगरपरिषदेचे ग्राउंड, ते गांधी चौक, पाचबाती नाका, व यशवंतनगर मोर्च्यावरून प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येने प्लॉट दाव्यधारक या मोर्च्यात सहभागी होवून व विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्च्यात माकपाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी माहाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर कॉ- रतन बुधर, तालुका सेक्रेटरी- कॉ यशवंत घटळ, जिल्हा कमिटी मेंबर- कॉ- लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी मेंबर कॉ- शिवराम घाटाळ, कॉ- शिवराम बुधर, कॉ- राजा गह्ला, कॉ- शांताराम माळी, जिल्हा कमिटी सदस्य कॉ- बाबू ढिगारे, कॉ- विजय शिंदे, कॉ- यशवंत बुधर, व माकपाचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी प्रांताधिकाऱ्यांना मोचेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. (वार्ताहर)