मुंब्रा, दिवा खाडीतील रेती माफियांवर कारवाई; सहा बार्ज जाळून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By सुरेश लोखंडे | Published: October 11, 2022 08:04 PM2022-10-11T20:04:34+5:302022-10-11T20:04:54+5:30
जिल्ह्यातील खाडी व नद्यांमध्ये रेती माफियांनी मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन अवैधरित्या सुरू केले आहेत. त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई आज हाती घेतली.
ठाणे : जिल्ह्यातील खाडी ठिकठिकाणच्या खाडीतील बेकायदेशीर, अवैधरित्या रेती उत्खनन करणाºया रेती माफियांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली. मुंब्रा बंदरासह दिवा, कोपर खाडी, मोठागांव बंदर आदी ठिकाणी मंगळवारी ही धडक कारवाई करण्यात आली. जिल्हा दक्षता पथक, रेतीगट शाखा, कल्याण तहसीलदार, तलाठी, बारावे, टिटवाळा येथील यंत्रणेने २१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा बार्ज जाळल्या.
जिल्ह्यातील खाडी व नद्यांमध्ये रेती माफियांनी मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन अवैधरित्या सुरू केले आहेत. त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई आज हाती घेतली. अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्या निर्देशानुसार या कारवाईदरम्यान या पथकाने खाजगी बोटीच्या साहाय्याने मोठागाव बंदर येथून कारवाईला सुरुवात करून कोपर आणि दिवा खाडीमध्ये तीन सक्शन पम्प पाण्यामध्ये बुडाविल्याचा दावा केला आहे. तर बार्ज जाळण्यात आले, या कारवाई पथकाची चाहूल लागताच मुंब्रा बंदरातील चार बार्जचे वॉल खोलून कामगारांनी खाडीतून पळ काढला. त्यामुळे चार सक्शन खाडीत बुडाविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहूल सारंग यांनी दिली.
जिल्हा दक्षता पथक, रेतीगट शाखा आणि कल्याण तहसीलदार यांच्या तलाठ्यांनी व बारावे, टिटवाळा येथील कारवाई पथकाच्या मनुष्यबळाने ही संयुकत करावाई केली. यामध्ये सक्शनपंपवरील चार कॅबिनही जाळण्यात आल्या आहेत. तर एक सक्शन खोल पाण्यात आणून गॅस कटरने कट करीतत खोल पाण्यात बुडाविल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह एकूण सात सक्शन पंपवरील २१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल आणि साह बार्ज जाळून नष्ट करण्यात महसूल विभागाला यश आलेले आहे.