जिमचालकांमध्ये हाणामारी
By admin | Published: April 27, 2017 11:39 PM2017-04-27T23:39:17+5:302017-04-27T23:39:17+5:30
फिटनेस सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेचा योगा करतानाचा फोटो व्हारयल केल्याच्या वादातून दोन फिटनेस सेंटरचे चालक
मीरा रोड : फिटनेस सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेचा योगा करतानाचा फोटो व्हारयल केल्याच्या वादातून दोन फिटनेस सेंटरचे चालक व त्यांचे सहकारी यांच्यात फ्री स्टाइल हाणामारी झाल्याची घटना भार्इंदरमध्ये घडली. पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.
भार्इंदर पश्चिमेस फिटनेस प्रयोरिट नावाची व्यायामशाळा आहे. कुंदन सूर्यवंशी (२८) हे ट्रेनर आहेत. या जिममध्ये काम करणाऱ्या राजकिरण भंडारी (२७) याने येथील काम सोडून इन्फिनिटी जिम चालवण्यास घेतली होती. आधीच्या जिममध्ये काम करत असताना भंडारीने तेथे योगासाठी येणाऱ्या एका महिलेचा फोटो काढला होता. नंतर, तो दुसऱ्याला दाखवल्याचे समजल्याने सूर्यवंशीने भंडारीच्या जिममध्ये जाऊन जाब विचारला असता दोघांमध्ये भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भंडारी हा साथीदारांसह गेला व मारहाण केली. (प्रतिनिधी)