क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट, जिटो ठाणे व जनसेवा ट्रस्ट आयोजित रास रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:56 PM2018-09-24T15:56:41+5:302018-09-24T16:01:21+5:30
नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यात रास रंग हा कार्यक्रम रंगणार आहे.
ठाणे : क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट, जिटो ठाणे व जनसेवा ट्रस्टच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त रास रांग २०१८चे १० ते १८ आॅक्टोबर मोडेला मिल कंपाऊंड, एलबीएस रोड, टीप टॉप प्लाढा जवळ, ठाणे (प.) येथे आयोजन केले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक जितेंद्र मेहता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या उत्सवाला दररोज १२ हजार लोक उपस्थित राहून नऊ रात्री हा उत्सव उत्साहाने साजरा करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. परंपरेनुसार नवरात्रीचे ढोल राजा या उत्सवात आणला जाणार आहे. यात रॉकस्टार नैतिक नागदा, उमेश बरोत, कोषा पांड्य, शरद तश्करी, दिव्या जोशी आणि अंबर देसाई हे कलाकार सहभागी होणार आहेत. या उत्सवासाठी ८० बाय ४० फुटांचा आणि एक लाख चौरस आकारांचा मंच तयार केला आहे. तसेच, या उत्सवाला सुरक्षा कवच दिले असून ६० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट व्हिडीओ कव्हरेज देखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटींनाही आमंत्रित केले जाणार आहे. दररोज सायं. ७ वा. श्री अंबे माँ यांच्या ग्रँड आरतीबरोबर रास रंग सुरू होणार आहे. यावेळी जीतो ठाणे चाप्टरचे महेंद्र जैन, प्रवीण छेडा, हेमंत मेहता, क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिटचे अजय अशर, सचिन मिरानी, मुकेश सावला, शैलेश पुराणिक, राकेश संघवी आणि युथ विंग एमसीएचआयचे मंथन मेहता, धैर्य शाह, जैनिल मेहता आदी उपस्थित होते. सुरूवातीला भूमिपुजन सोहळा पार पडला.