नालासोपाऱ्यातील १३ बिल्डर्सवर गुन्हे
By admin | Published: May 10, 2016 01:51 AM2016-05-10T01:51:24+5:302016-05-10T01:51:24+5:30
महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व्हे नं.४११ या आदिवासी व बिगर आदिवासी जमिनीवर ३५ बिल्डर्सनी अनधिकृतपणे इमारती बांधून सिडको, महानरगपालिका यांचे बोगस परवाने तयार
विरार : महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व्हे नं.४११ या आदिवासी व बिगर आदिवासी जमिनीवर ३५ बिल्डर्सनी अनधिकृतपणे इमारती बांधून सिडको, महानरगपालिका यांचे बोगस परवाने तयार करून सात बारा उतारे ही बनवून त्या आधारे निबंधकांकडे दस्तऐवजाची नोंदणी करून सामान्य नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या व पालिकेचा लाखो रुपये महसूल बुडवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज १३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
एकूण ३५ विकासकांनी जनतेची व महानगर पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
भाजपचे वसई-विरार उपजिल्हाप्रमुख मनोज पाटील यांनी माहितीच्या अधिकारात हा घोटाळा उघड केला होता.
विकास अराखड्यात ना विकास क्षेत्र असलेल्या शासन जमा व आदिवासी १२ एकर भूखंडांवर ४५ पेक्षा अनधिकृत हमारतीचे बांधकाम खोटे बांधकाम परवाने, खोटा अकृषक दाखला, बोगस साताबारा उतारे इ. वापर करून निबंधक कार्यालयात १२०० हून अधिक सदनिकांची
विक्र दस्तऐवज नोंदणी करण्यात आली असून हा घोटाळा २००
कोटींचा असल्याचा अंदाज आहे. बँका व वित्त संस्थांचीही फसवणूक या प्रकरणात झाली आहे. असे उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)च्विशेष म्हणजे ही माहिती महापालिकेने पाटील यांना पुरविलेल्या कागदपत्रांद्वारे उघड झाली आहे. या प्रकरणाबबात कारवाईसाठी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे मनोज पाटील यांनी तक्रार केली.
च्त्यानुसार राज्यमंत्र्यांनी संबंधित बांधकाम व्यवासायिकांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
च्त्यानुसार महापालिका प्रशासनाने या फसवणुकीबाबतची कागदपत्रे नालासोपारा पोलिसांकडे देताच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.