अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Published: February 15, 2024 08:32 PM2024-02-15T20:32:44+5:302024-02-15T20:33:04+5:30

कापूरबावडी पोलिसांची कारवाई: मुलाला न सांभाळल्याच्या रागातून दिली शिक्षा

crime against a teacher who beat up a minor girl by employing her | अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एका ११ वर्षीय मुलीला कामासाठी दिल्ली येथून ठाण्यात आणल्यानंतर तिने घरकाम चांगल्या प्रकारे न केल्याने आणि मुलाचा सांभाळही नीट न केल्याने तिला घरातील एका पाईपने मारहाण करणाऱ्या पूजा यादव (३३) या केंद्रीय विद्यालयातील शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिला याप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी गुरुवारी दिली.

कोलशेत रोड, लोढा आमारा या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या यादव कुटूंबीयांकडे या अल्पवयीन मुलीच्या आईने तिला कामासाठी एक महिन्यांपूर्वी दिल्ली येथून पाठविले होते. ती चांगले काम करीत नसल्याचा आरोप करुन तिला मारहाण करुन पुरेसे खायलाही दिले जात नव्हते. ती या शिक्षिकेच्या मुलाचाही सांभाळ करीत नसल्याचे सांगत तिला एका पाईपनेही डिसेंबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या दरम्याने तिने मारहाण केली.

या प्रकाराला कंटाळून ही मुलगी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी घरातून बाहेर जात असतांना तिची या शिक्षिकेने अडवणूक केली. ती रडत असतांनाच शेजाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर याप्रकरणी परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध मारहाणीसह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तिला ४१-१-अ नुसार नोटीसही बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: crime against a teacher who beat up a minor girl by employing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.