घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:57 AM2018-07-10T03:57:02+5:302018-07-10T03:57:14+5:30
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले.
उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले. तसेच २४ गुन्ह्यांची उकल झाली असून चौकशीत अधिक माहिती मिळणार असल्याची माहिती सहा. आयुक्त बाजीराव भोसले यांनी दिली.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भरदिवसा गाडीचा वापर करून घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. जुल्फीकार ऊर्फ राजू हसमत अली इद्रिसी (२३), ब्रिजेशकुमार जगलपाल गुप्ता (२२) यांना अटक केल्यावर चौकशीत त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल २४ ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १४ लाखांचे सोनेचांदीचे दागिने हस्तगत केले असून चौकशीत अधिक गुन्ह्याची उकल होण्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. हे चौघेही उत्तर भारतीय असून मालाड येथे राहण्यास आहेत.
भरदिवसा चोºया करणाºया टोळीचा छडा लावल्याने चोरीला काही प्रमाणात आळा बसणार असल्याची माहिती बाजीराव भोसले यांनी दिली. उल्हासनगर परिसरात चोºयांसह गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून त्यांचाही छडा लागण्याची शक्यता आहे.
अन्य दोघांना होणार अटक
चौकडीवर विविध पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल असून ते जेलची हवा खाऊन आले आहेत. त्यांच्या अन्य दोन साथीदारांना लवकरच अटक करणार असल्याचे महेश तरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे शहरातील चोरीवर आळा बसू शकेल.