अंबरनाथमध्ये मोहन ग्रुपविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:18 AM2020-03-03T01:18:04+5:302020-03-03T01:18:10+5:30
अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक मोहन ग्रुपच्या भागीदारांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक मोहन ग्रुपच्या भागीदारांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहन सबरबिया या इमारतीमधील पाच कोटी ६१ लाखांच्या कॉर्पाेरेट फंडावरून वाद असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. कॉर्पाेरेट फंडाचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा येथे मोहन ग्रुपचा भव्य गृहप्रकल्प सुरू आहे. फेज-२ मध्ये मनोहर वजराणी यांनी काही वर्षांपूर्वी येथे एक फ्लॅट विकत घेतला होता. फ्लॅट घेताना ग्राहकांकडून बांधकाम व्यावसायिकाने कॉर्पाेरेट फंडाची रक्कमही जमा केली होती. तसेच येथील रहिवाशांना गृहप्रकल्पात अनेक सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. वारंवार मागणी करूनही बांधकाम व्यावसायिक रहिवाशांना त्यांच्या सोयीसुविधा पुरवत नसल्याची तक्र ार येथील रहिवाशांनी केली आहे. याप्रकरणी मोहन सबरबिया येथील सॅलीसबरी येथे राहणारे मनोहर वजराणी यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांना या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
>या प्रकरणासंदर्भात मोहन ग्रुपचे तुषार गांधी यांना विचारले असता आमच्या विरोधात केलेल्या आरोपात तथ्य नसून पोलिसांच्या तपासात सर्व गोष्टी उघड होतील. तसेच आम्ही पोलिसांनी सर्व तपासात सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.