खंडणीखोर पत्रकाराविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:43+5:302021-09-12T04:46:43+5:30
कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सलून आणि स्पाच्या अधिकृत परवानग्या घेऊन व्यवसाय करणाऱ्या ३३ वर्षीय ...
कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सलून आणि स्पाच्या अधिकृत परवानग्या घेऊन व्यवसाय करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेकडून २० हजारांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या एका न्यूज पोर्टलचा कथित पत्रकार हॅरिसन डिमेलो याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्याने या महिलेला पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
डिमेलो हा एसबीटी न्यूज हे वेब पोर्टल चालवतो. त्याने कापूरबावडी येथील एका सलून व स्पाच्या मालकीण असलेल्या दिवा येथील महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन तसेच पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन २० हजारांच्या खंडणीची मागणी केली. ३१ ऑगस्ट २०२१ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये फेसबुक आणि ट्विटरवरही त्याने या महिलेची जाणीवपूर्वक बदनामी केली. तसेच ४ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन २० हजारांची खंडणी मागितली. अखेर याप्रकरणी या महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.