माफी व्हिडीओमुळे भिवंडीत सात जणांवर गुन्हा

By Admin | Published: March 19, 2017 05:39 AM2017-03-19T05:39:19+5:302017-03-19T05:39:19+5:30

आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात मागणी घालणाऱ्या, वाहतूक रोखून धरत तिला फूल देणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजाची बदनामी झाल्याचे सांगत

Crime against seven people favored by forgiveness videos | माफी व्हिडीओमुळे भिवंडीत सात जणांवर गुन्हा

माफी व्हिडीओमुळे भिवंडीत सात जणांवर गुन्हा

googlenewsNext

भिवंडी : आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात मागणी घालणाऱ्या, वाहतूक रोखून धरत तिला फूल देणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजाची बदनामी झाल्याचे सांगत त्या दोघांचे अपहरण करणाऱ्या, त्यांना जबरदस्तीने माफी मागायला लावणाऱ्या आणि त्याचा नव्याने व्हिडीओ तयार करणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमद रईस मोमीन याचा साखरपुडा सुमाना मोमीनशी होणार होता. त्याच दिवशी दुपारी ती शाळेतून घरी परतत असताना अहमदने तिला भररस्त्यात मागणी घातली. तिला गुलाबाचे फूल दिले आणि तिने होकार देईपर्यंत वाहतूक रोखून धरण्याचा स्टेट केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी धोबीतलाव येथे होणारा साखरपुडा रद्द करून तो नाशिक रोडवरील हॉटेलमध्ये केला. तरीही काही लोक अहमदला घडल्या प्रकाराबद्दल धमक्या देत होते. त्यानंतर दिवसानी १३ मार्चला अहमदच्या घरी तन्वीर शेख आणि अशहद मोमीन गेले. घरच्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना असता तय्यब मोहम्मद ईस्माईल, मोहम्मद अरफात, सोशल वर्कर मलीकचा मुलगा अझहर आणि त्यांचे चार साथीदार तेथे आले. त्यांनी अहमदविषयी विचारणा केली. तो घरात नसल्याने त्या सातजणांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर त्याला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नाशिक रोडवरील कशीश हॉटेलमध्ये नेले. तेथे एका खोलीत कोंडून त्यांना मुस्लिम समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे व्हिडीओ शुटींग केले. संपूर्ण समाजाची माफी मागितल्याशिवाय तुला सोडणार नाही, अशी धमकी तय्यब याने दिली. नंतर या घटनेची व्हिडीओ क्लिप व्हायरल केली. तसेच हातपाय तोडण्याची धमकी देत दोघांना साडेपाच वाजेपर्यंत तेथेच जबरदस्तीने डांबून ठेवले.
त्यांचा तपास लागत नसल्याने आणि नातेवाईकांकडून विचारणा होऊ लागल्याने तन्वीर शेखने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी)

अद्याप अटक नाही : तय्यब ईस्माईल, मोहम्मद आरफात, मलीकचा मुलगा, सोबतच्या चार जणांविरोधात तक्रार येऊनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. मात्र टीकेची झोड उठल्याने अपहरण, मारहाण आणि कोंडून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र कोणालाही अटक केलेली नाही.

Web Title: Crime against seven people favored by forgiveness videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.