ठाण्यात ७० हजारांची वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 08:42 PM2021-08-15T20:42:01+5:302021-08-15T20:45:54+5:30
वीजमीटर बॉक्समधून बेकायदेशीरपणे ४५ हजारांची चार हजार ३२ युनिटची चोरी करणाºया सुनिल परमार आणि सोनल व्यास तसेच ३० हजार रुपयांची दोन हजार ७२२ युनिटची वीज चोरी करणाºया रवी वीर आणि मनिष परमार या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वीजमीटर बॉक्समधून बेकायदेशीरपणे ४५ हजारांची चार हजार ३२ युनिटची चोरी करणाºया सुनिल परमार आणि सोनल व्यास तसेच ३० हजार रुपयांची दोन हजार ७२२ युनिटची वीज चोरी करणाºया रवी वीर आणि मनिष परमार या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या वतीनेही सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कासारवडवली येथील संजय तांडेल चाळीतील संतोषी हॉटेलच्या मागे असलेल्या सुनिल परमार आणि सोनल व्यास यांनी घराजवळ असलेल्या वीज मीटर बॉक्समधून सेवा वायर कट करुन विजेचा अनधिकृतपणे स्वत:च राहत्या घरात अवैधरित्या ४५ हजार ६१० रुपयांच्या चार हजार ३२ इतक्या युनिटची वीज चोरी केली. राज्य वीज वितरण कंपनीच्या कोलशेत उपविभागाचे किसन घेरडे यांच्या पथकाने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याखाली १३ आॅगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, अन्य एका प्रकरणात ओवळा येथील रवी वीर आणि मनिषा परमार यांनीही घराजवळ असलेल्या वीजमीटर बॉक्समधून अनधिकृतपणे दोन हजार ७२२ युनिटची ३० हजार ६५५ रुपयांची वीज चोरी केल्याचे वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्याच आधारे कोपरी पोलीस ठाण्यात १३ आॅगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.