उल्हासनगरात ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:50 IST2019-04-14T23:50:41+5:302019-04-14T23:50:47+5:30
अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदू समाजाबाबत काढलेल्या अपशब्दावर आक्षेप घेऊन महिला वकील राखी बारोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

उल्हासनगरात ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा
उल्हासनगर : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदू समाजाबाबत काढलेल्या अपशब्दावर आक्षेप घेऊन महिला वकील राखी बारोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले. याबाबत येथील वकील राखी बारोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शनिवारी मातोंडकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी हा विरोधकांचा स्टंट असल्याचा आरोप केला आहे.