शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे विरोधात अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:38 AM2018-02-11T03:38:13+5:302018-02-11T03:38:19+5:30
पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणा-या ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा कळव्यातील नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात शुक्रवारी मध्यरात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गणेश याच्यासह त्याचे वडील मलिकार्जुन आणि भाऊ केतन या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणा-या ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा कळव्यातील नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात शुक्रवारी मध्यरात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गणेश याच्यासह त्याचे वडील मलिकार्जुन आणि भाऊ केतन या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामुळे गणेश याच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नगरसेवक गणेश याने मारहाणीनंतर तक्र ार नोंदविण्यासाठी त्याची पत्नी कॅरलीन कांबळे या कळवा पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, कांबळे याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्र ार नोंदवून घेण्यासाठी कळवा पोलिसांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाच्या प्रमाणपत्राची मागणी केली, असा आरोप त्यांनी केला होता. कॅरलीनच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धाव घेऊन ठाण्यात पत्रकार परिषद घेतली होती.
दरम्यान,शहर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिले होते. त्यानुसार,शुक्र वारी सायंकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्र ार नोंदविली. यामध्ये गणेश कांबळे याने मारहाण, शारीरिक तसेच मानिसक छळ आणि दागिन्यांचा अपहार, अत्याचार केल्याचा आरोप कॅरलीन यांनी केला आहे. या घटनेने कळवा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
सासरे,दिराकडूनही छळ
सासरे मलिकार्जून आणि दीर केतन या दोघांनीही शारीरिक तसेच मानिसक छळ केल्याचा आरोपही त्यांनी त्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बगडे यांनी दिली.