ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

By सदानंद नाईक | Published: May 28, 2023 07:13 PM2023-05-28T19:13:35+5:302023-05-28T19:13:50+5:30

शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले.

Crime Capital City of Thane District says Jitendra Awad | ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

googlenewsNext

उल्हासनगर : शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे. तसेच आमदार किणीकरसह अन्य जण मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे मत कार्यक्रमात व्यक्त केले. उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कॅम्प नं-५ परिसरात शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी केले होते. कार्यक्रमाला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे आदी जण उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख यांचा खून झाला असून मटकी जुगाराच्या वादातून खून झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणावरून आव्हाड यांनी जिल्ह्या क्राईम कॅपिटल झाल्याची टीका त्यांनी केली. तसेच शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर मातोश्रीच्या संपर्कात असून त्यांना मातोश्रीच्या प्रवेश दिला जाणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 

शहर राष्ट्रवादीत कलानी व गंगोत्री असे गट पडले असून भारत गंगोत्रीसह समर्थकांना पक्ष प्रवेश व पदाधिकारी बैठक कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही. असा आरोप गंगोत्री समर्थक करीत आहेत. तसेच शहरभर लावलेल्या पोस्टर्सवर गंगोत्री यांना स्थान देण्यात आले नाही. पक्षातील वादावर आव्हाड यांनी टाळले असून परांजपे यांनी पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. कलानी यांच्यावर उल्हासनगर विधानसभा संघासह कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचा पदभार देण्याची घोषणा यावेळी केली. पदाधिकारी बैठकीच्या पोस्टर्सवर शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांचे फोटो झळकले आहे. मात्र बैठकीला पप्पु कलानी व ओमी कलानी यांनी दांडी मारल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. तसेच पक्षातील वाद मिटल्यास पक्षाची शक्ती वाढणार असल्याचे बोलले जाते.
 

Web Title: Crime Capital City of Thane District says Jitendra Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.