ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:19 PM2021-07-14T23:19:38+5:302021-07-14T23:25:00+5:30

कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Crime of molestation against Thane Municipal Corporation Deputy Commissioner Vishwanath Kelkar | ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

केळकर यांनी आरोप फेटाळला

googlenewsNext
ठळक मुद्देकेळकर यांनी आरोप फेटाळलाकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत केळकर यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल कोरोना रु ग्णालयात पिडीत महिलेची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती झाली होती. त्यावेळी उपायुक्त केळकर यांच्याकडे या रु ग्णालयाचा कारभार होता. काही महिन्यांपूर्वी रु ग्णालयात काम करतांना केळकर यांनी विनयभंग केल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केला होता. त्यानंतर कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने या महिलेला कामावरून काढले. याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. तसेच केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाईला वेग आला. बुधवारी सायंकाळी पिडीत तरुणीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.
*आरोपांमध्ये तथ्य नाही- केळकर
कायद्यांतर्गत विशाखा समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या कायद्यामध्ये सुनावणीतील तथ्यांविषयी कोणतीही माहिती उघड करता येत नाही. त्यामुळे सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाही. विशाखा समिती समोरील चौकशीत आणि पोलीस तपासात मी निर्दोष असेल, याची खात्री आहे. हे सर्व आरोप दृष्टबुद्धीने केले आहे. यात काहीही तथ्य नसल्याचा दावा उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी केला आहे.

Web Title: Crime of molestation against Thane Municipal Corporation Deputy Commissioner Vishwanath Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.