Crime News : उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली, शिवसेनेचे पोलीस उपायुक्तांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:12 PM2021-10-20T23:12:01+5:302021-10-20T23:49:07+5:30
Crime News : उल्हासनगरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी संख्येत वाढ झाल्याने, शहरात पोलिसांचा वचक संपला का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
उल्हासनगर : शहरात हाणामारी, बलात्कार, फसवणूक, खून, क्रिकेट सट्टा, चोरी, अंमली पदार्थांची विक्री आदींच्या घटनेत वाढ झाली असून गेल्या गुरवारी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेचा निषेध करून गुन्हेगारावर वचक बसविण्याची मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे केली.
उल्हासनगरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी संख्येत वाढ झाल्याने, शहरात पोलिसांचा वचक संपला का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. गेल्या गुरवारी मध्यरात्री दोन गटात सुरू असलेली हाणामारी सोडविण्यासाठी रात्र गस्तीवर असलेले विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे ऑनड्युटी पोलीस शिपाई गणेश डमाले व गणेश राठोड गेले. त्यावेळी संतप्त झालेल्या नरेश लेफटी यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या पोलीस शिपाई गणेश डमाले यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. पोलिसावरही हल्ल्याने एकच खळबळ उडून सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. विठ्ठलवाडी पोलीस तपासात क्रिकेट सट्टावरून दोन गटात हाणामारी झाल्याचे उघड झाले. फरार झालेल्या आरोपीना गुजरात बलसाड येथून अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
रप्रमुख दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे, शिवसेना शहराजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई अशान, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, अरुण अशान आदींनी पोलिसा वरील हल्ल्याचा निषेध करून शहरभर निषेधाचे पोस्टर्स लावली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खाली मंगळवारी दुपारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी भेट घेऊन, शहर गुन्हेगारिवर अंकुश ठेवण्याची मागणी केली. तसेच अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने, नशेखोरांची संख्या वाढल्याचा आरोप चौधरी यांनी केला. महापालिका सार्वत्रिक निवडणूक ४ महिन्यावर ठेपली असून निवडणुकीत अश्या गुन्हेगारांचा त्रास राजकीय पक्ष नेत्यांना होणार आहे. असे चौधरी यांनी पोलीस उपयुक्तांना माहिती देऊन तडीपारसह इतर कारवाई करण्याची मागणी केली.
गुन्हेगारीसाठी विशेष पथकाची स्थापना
शहरातील गुन्हेगारी संख्या व पोलीस हल्ल्या बाबत शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन शहरातील गुन्हेगारीची माहिती दिली. तेंव्हा गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याचे आश्वासन पोलीस उपयुक्तांनी दिले.