Crime News: मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेला गुंड जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Updated: January 2, 2023 23:00 IST2023-01-02T23:00:06+5:302023-01-02T23:00:33+5:30
Crime News: हाणामारीसह अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या राकेश जाधव (२४, रा. ठाणे) याला मुंबई-ठाण्यातून दोन वर्षांसाठी पोलिस उपायुक्तांनी हद्दपार केले होते.

Crime News: मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेला गुंड जेरबंद
ठाणे - हाणामारीसह अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या राकेश जाधव (२४, रा. ठाणे) याला मुंबई-ठाण्यातून दोन वर्षांसाठी पोलिस उपायुक्तांनी हद्दपार केले होते. तो बेकायदा फिरताना आढळल्याने त्याला पुन्हा जेरबंद करून त्याच्यावर १४२ नुसार कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
राकेश जाधव याला ठाणे आणि मुंबई, नवी मुंबईतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी १६ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले होते. पोलिस उपायुक्तांची परवानगी न घेता हा आरोपी मनाई आदेशाचे उल्लंघन करून १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ मोकाट फिरताना पोलिसांना आढळला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार तडवी हे अधिक तपास करीत आहेत.