Crime News: मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १० महिन्यात ७५ टक्के गुन्हे उघडकीस आणले
By धीरज परब | Published: November 29, 2022 03:21 PM2022-11-29T15:21:35+5:302022-11-29T15:22:19+5:30
Crime News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर ह्या १० महिन्यात ६ हजार ९३२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५ हजार १९४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर ह्या १० महिन्यात ६ हजार ९३२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५ हजार १९४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे .
२०२१ सालात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६ हजार १०८ गुन्हे दाखल होते . त्यापैकी ४ हजार ७२१ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले . यंदाच्या वर्षातील पहिल्या १० महिन्यात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे .
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांची गुन्हे बाबत नियमित आढावा बैठक होत असतात . गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करून नका अशी स्पष्ट ताकीद दाते यांनी अधिकाऱ्यांना दिली आहेच शिवाय त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांसाठी सार्वजनिक असल्याने नागरिक सुद्धा थेट त्यांच्याशी संपर्क साधतात . त्यामुळे गुन्हे न दाखल करून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे .
गुन्ह्यांची उकल व आढावा , आरोपीना शिक्षा होण्यास प्राधान्य दाते यांनी दिले आहे . पोलिसां विरोधात तक्रार असल्यास व त्यात तथ्य आढळल्यास बहुतांश प्रकरणात कार्यवाही केली जात आहे . गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात सीसीटीव्ही ने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे . दाते यांनी त्यामुळेच सीसीटीव्हीचे जाळे लोकांच्या सहभागातून उभारण्यास प्राधान्य दिले. आयुक्तालयाच्या हद्दीत १६ पोलीस ठाणी तसेच गुन्हे आदी शाखा आहेत . दर महिन्याला गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलिसांना पुरस्कार दिला जातो त्यामुळे सुद्धा पोलिसां मध्ये चांगले स्पर्धात्मक वातावरण आहे .
गेल्या १० महिन्यात उत्तन पोलीस ठाण्यात सर्वात कमी म्हणजे ७१ गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी ६१ चूनही उघडकीस आले आहेत . सर्वात जास्त ९१८ गुन्हे वालिव पोलीस ठाणे हद्दीत दाखल असून ६३५ गुन्हे उघडकीस आणले आहेत . गुन्हे उघडकीस आणण्याची टक्केवारी विचारात घेतली तर ८६ टक्के उत्तन , ८३ टक्के काशीमीरा , ८१ टक्के मीरारोड , ८० टक्के पेल्हार व नवघर , ७९ टक्के वसई व अर्नाळा , ७८ टक्के तुळींज , ७६ टक्के भाईंदर तर ७५ टक्के नालासोपारा अशी आहे .
पोलीस ठाणे दाखल गुन्हे उघडकीस गुन्हे
वालिव पोलीस ठाणे ९१८ ६३५
विरार पोलीस ठाणे - ८११ ५४४
पेल्हार पोलीस ठाणे ६८५ ५५१
नवघर पोलीस ठाणे ५६६ ४५०
काशीमीरा पोलीस ठाणे ५५१ ४५७
तुळींज पोलीस ठाणे ५१६ ४००
नया नगर पोलीस ठाणे ४४८ ३३२
आचोळे पोलीस ठाणे ४०९ २९१
भाईंदर पोलीस ठाणे ३८४ २९४
नालासोपारा पोलीस ठाणे ३७६ २८१
माणिकपूर पोलीस ठाणे ३२० २२१
अर्नाळा पोलीस ठाणे २५७ २०३
मीरारोड पोलीस ठाणे २५० २०२
वसई पोलीस ठाणे २३४ १८४
मांडवी पोलीस ठाणे १३६ ८८
उत्तन पोलीस ठाणे ७१ ६१