सर्व्हिस सेंटर चालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:53+5:302021-03-20T04:40:53+5:30

----------------------------------------- बॅटऱ्यांची चोरी कल्याण : टुरिझमचा व्यवसाय असलेल्या संतोष देशपांडे यांनी त्यांची बस सोमवारी बिर्ला कॉलेज रोडवरील संभाजी नगर ...

Crime on service center drivers | सर्व्हिस सेंटर चालकांवर गुन्हा

सर्व्हिस सेंटर चालकांवर गुन्हा

Next

-----------------------------------------

बॅटऱ्यांची चोरी

कल्याण : टुरिझमचा व्यवसाय असलेल्या संतोष देशपांडे यांनी त्यांची बस सोमवारी बिर्ला कॉलेज रोडवरील संभाजी नगर येथे उभी केली होती. त्या बसच्या दोन बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------

दुचाकी चोरीला

कल्याण : राहुल बर्वे यांनी त्यांची दुचाकी गोविंदवाडी बायपास रोडवरील फानुस ढाब्यासमोर सोमवारी पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात बर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

फावड्याने मारहाण

कल्याण : अदनान अफजल शेख याने इम्रान शेख याला मोबाइल मागतो या रागातून फावड्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या दरम्यान मलिका मशिदीच्या जवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी इम्रान याची आई फरजाना हिने दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदनान विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------

रोकड लंपास

डोंबिवली : पूर्वेतील आयरे रोडवरील राजाजी पथ परिसरातील पंचरत्न सोसायटीत राहणारे संतोष चव्हाण यांच्या घराच्या उघड्या दरवाजा वाटे आतमध्ये घुसून चोरट्याने पँटच्या खिशातील १० हजाराची रोकड लंपास केली. या चोरीप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा तन्मय चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्याआधारे चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------

६३ हजारांचा ऐवज लंपास

डोंबिवली : पूर्वेतील लोढा हेवनमधील शंकलेशा ज्वेलर्समध्ये बुरखा घातलेल्या दोन महिला सोमवारी सायंकाळी ६ वाजता आल्या. खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी नाकात घालण्याच्या सोन्याच्या फुलांचे ६३ हजार ५४० रुपयांचे ३४ नग चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------

Web Title: Crime on service center drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.