उल्हासनगरात ३ बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे; भूमाफियांचे दणाणले धाबे
By सदानंद नाईक | Published: October 18, 2023 06:20 PM2023-10-18T18:20:17+5:302023-10-18T18:20:37+5:30
महापालिकेच्या तक्रारीवरून दोन दिवसात एकून ३ अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत उल्हासनगर व मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर : महापालिकेच्या तक्रारीवरून दोन दिवसात एकून ३ अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत उल्हासनगर व मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या कारवाईने भूमाफियां व अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, जवाहर हॉटेल परिसरात झालेल्या अवैध बांधकामावर महापालिकेने पाडकाम कारवाई करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अवैध बांधकाम करणारे मायकल इमोहीन यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली. तसेच गोप बहरानी चौकातील अवैध बांधकाम प्रकरणी महालिकेच्या तक्रारीवरून हासानंद बहारानी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला. काम नं-१ परिसरात ३ मजली अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई करून बांधकामधारक भावनदास आहुजा यांच्यासह इतर साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसात ३ एमआरटीपी अंतर्गत गुभे दाखल झाल्याने, भूमाफियां व अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे. अवैध बांधकामे महापालिकेच्या टार्गेटवर असून पाडकाम कारवाई करून एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.