उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखासह ९ जणांवर गुन्हे; मशाल मोर्चेत अपशब्द काढल्याबाबत कारवाई

By सदानंद नाईक | Published: October 24, 2022 04:10 PM2022-10-24T16:10:41+5:302022-10-24T16:11:24+5:30

शाखा प्रमुख सागर कांबळे याला अटक केली असून चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. 

crimes against 9 people including ulhasnagar shiv sena city chief action regarding abuse in mashal morcha | उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखासह ९ जणांवर गुन्हे; मशाल मोर्चेत अपशब्द काढल्याबाबत कारवाई

उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखासह ९ जणांवर गुन्हे; मशाल मोर्चेत अपशब्द काढल्याबाबत कारवाई

googlenewsNext

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाने काढलेल्या मशाल मोर्चात मुख्यमंत्रीसह अन्य जणांवर अपशब्द काढल्या बाबत शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह ९ जनावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. तर शाखा प्रमुख सागर कांबळे याला अटक केली असून चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. 

उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाने पक्षाचे चिन्हे घराघरात जाण्यासाठी शनिवारी शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वय धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, शेखर यादव, दिलीप गायकवाड, शेखर यादव, धीरज ठाकूर, बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. मराठा सेक्शन जिजामाता गार्डन येथून निघालेला मोर्चा ओटी सेक्शन, पवई चौक, श्रीराम चौक, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन मार्ग, शांतीनगर, महापालिका मार्गे मध्यवर्ती पोलीस ठाणे परिसरात निघाला. मोर्चात ५० खोके, एकदम ओके, गद्दार, निंब का पत्ता कडवा है आदी घोषणा देण्यात आल्या. काही घोषणेवर विरोधकांनी आक्षेप नोंदविल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह ९ जनावर १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले. 

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महिला आघाडीच्या मंगला पाटील, मनिषा राजपुत, सागर सोनकांबळे यांच्यासह ९ जणांवर कारवाई केली. त्यांना नोटिसा पाठवून चौकशी साठी बोलाविण्यात येणार आहे. तर शाखा प्रमुख सागर कांबळे याला मशाल मोर्चातील घोषणेबाजी प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. अशी माहिती चौधरी यांनी दिली. तर आम्हीही चौकशीला सामोरे जाणार असून कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. तर शिवसेना ठाकरे गटाने, पोलीस कारवाई बाबत आश्चर्य व्यक्त करून सत्ताधाऱ्यांचे एकदिवस बिंग फुटणार असल्याची माहिती शिवसैनिक देत आहेत. जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनीही या कारवाई बाबत नाराजी व्यक्त करून निषेध केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: crimes against 9 people including ulhasnagar shiv sena city chief action regarding abuse in mashal morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.