टोरंट पावर विरोधी मोर्चातील ३७ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
By नितीन पंडित | Updated: September 4, 2023 15:47 IST2023-09-04T15:45:28+5:302023-09-04T15:47:40+5:30
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : टोरंट पॉवर विरोधात मोर्चा काढणाऱ्या महाविकास संघर्ष समितीच्या ३७ आंदोलकांविरोधात शहर पोलीस ...

टोरंट पावर विरोधी मोर्चातील ३७ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: टोरंट पॉवर विरोधात मोर्चा काढणाऱ्या महाविकास संघर्ष समितीच्या ३७ आंदोलकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने सोमवारी दिली आहे.
शहरात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टोरंट पॉवर कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी भिवंडी पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही आंदोलकांनी मोर्चा काढलाच होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
पोलीस परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने महाविकास संघर्ष समितीचे पदाधिकारी माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रुपेश म्हात्रे,माजी आमदार रशीद ताहीर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, कॉम्रेड विजय कांबळे, शरद पाटील,मनोज गगे, विश्वास थळे, माजी नगरसेवक मतलुब सरदार, पंकज गायकवाड,रवीश मोमीन, तुफेल फारुकी, अरुण पाटील,प्रतीक जंगलानी, नसीम खान, जयमाला पाटील, अरविंद म्हात्रे,संदीप म्हात्रे,जावेद फारुकी, दुर्गेश नाईक, यांच्यासह एकूण ३७ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.