भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त
By नितीन पंडित | Published: April 20, 2024 04:49 PM2024-04-20T16:49:48+5:302024-04-20T16:50:12+5:30
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले.
नितीन पंडित, भिवंडी: शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार असे अटक आरोपीचे नाव आहे.
एका हॉटेलमध्ये टेबलावर राहिलेला मोबाईल चोरी केल्याची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असता या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत असताना सीसीटिव्ही च्या माध्यमातून रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार या संशयित मोबाईल चोरट्यास नवीबस्ती परिसरातून अटक केली.
त्याच्या कडे कडून तपास केला असता हॉटेल मधील मोबाईल चोरी सह वर्तक नगर पोलिस ठाणे हद्दीत २०२२ मध्ये केलेल्या घरफोडीतील १२ मोबाईल सुध्दा हस्तगत केले असून आरोपी कडून एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे १३ मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले आहे.विशेष म्हणजे अटक केलेला गुन्हेगार रिझवान उर्फ रिज्जो नबी इनामदार यावर चोरी, जबरी चोरी अशा पद्धतीचे भिवंडी,ठाणे,कल्याण व मुंबई या परिसरात एकूण २१ गुन्ह्याची नोंद आहेत अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.