भिवंडीत अधिका-यांवर गुन्ह्याची मागणी, नवीवस्तीला अनधिकृतपणाचा शाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:15 AM2017-11-25T03:15:33+5:302017-11-25T03:15:44+5:30
भिवंडी : कल्याण रोडच्या नवीवस्तीत शुक्रवारी चार मजली इमारत कोसळल्यानंतर रहिवाशांनी पालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे.
भिवंडी : कल्याण रोडच्या नवीवस्तीत शुक्रवारी चार मजली इमारत कोसळल्यानंतर रहिवाशांनी पालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे. प्रशासकीय अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना शहरात घडत असल्याने प्रशासनातील अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरिकांनी केली. दुर्घटना घडली तेथील गल्ल्या अरूंद असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. अखेर काही बांधकामे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.
यंत्रमागाचे शहर असल्याने येथे मोठ्या संख्येने कामगारवर्ग आहे. येथे आलेला अशिक्षित कामगार मिळेल तो निवारा शोधत असतो. शहानिशा न करता केवळ करारनाम्यावर भरवसा ठेऊन जागा विकत घेतली जाते. जेथे नवीवस्ती नावाची ही वसाहत आहे, त्या भागातील वज्रेश्वरी संस्थानाच्या जागेत टेकडीवर केवळ हनुमान मंदिर होते. १९८४ साली दंगल झाली तेंव्हा पीडीतांना येथील वनविभागाच्या जागेवर वसविल्याने नवीवस्ती आकाराला आली. त्याच जागेवर उभ्या झालेल्या झोपड्यांचा आधार घेऊन येथील वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले. कामगारांनी निवाºयासाठी घेतलेल्या झोपड्यांचा व्यवहार वाढून टप्प्याटप्प्याने त्या तिसºया पिढीकडे गेल्या आणि त्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. तेथे अशाप्रकारे ताहीर रफीक अन्सारी याने प्रथम आरसीसी नंतर वर लोडबेअरिंगने मजले बांधले. परिणामी ही इमारत केवळ पाच वर्षातच कोसळली. ही इमारत अनाधिकृत आहे, याचा दाखला पालिका प्रशासनाने देण्याची आवश्यकताही नाही. कारण परिसरात दंगल पीडितांचे पुनर्वसन सोडून इतर जागाच कोणाच्या मालकीची नाही.
इमारतीपुढे तीन व्यावसायिक गाळे असल्याने दुर्घटनेतील जीव वाचविण्यासाठी ते गाळे प्रथम जेसीबीने तोडले आणि विटांचा खच बाजूला करीत इमारतीखाली अडकलेल्यासाठी मदतकार्य सुरू झाले. दुपारी एक वाजला तरी इमारतींचे सर्व स्लॅब उचलले गेले नव्हते. रस्त्यात पडलेले डबर उचलण्यासाठी आलेला डम्पर गल्लीत घुसत नसल्याने रस्त्यात येणारे बांधकाम पालिकेच्या कर्मचाºयांनी तोडले आणि नंतरच मदतकार्य, उत्खनन सुरू झाले. त्यामुळे दुपारनंतर ढिगाºयाखाली असेलेले दोन मृतदेह सापडले. ही दुर्घटना समजल्यावर पालिकेचे सर्व उपायुक्त व अधिकारी, कर्मचारी,अग्निशमन दल,आपत्ती निवारण दल घटनास्थळी आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे ४० जवान तसेच कल्याण पालिकेचे अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.
<दाट लोकवस्तीतील इमारत कोसळल्यानंतर तेथे पोचून मदतकार्य कसे करायचे हाच प्रश्न यंत्रणेसमोर उभा ठाकला. इमारत कोसळल्यानंतर ढिगाºयाखाली अडकलेल्यांचा आकांत सुरू होता. ज्या गल्लीत इमारत कोसळली होती, तेथे जेसीबीही जाऊ शकत नव्हता.