ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा

By admin | Published: July 4, 2017 05:19 AM2017-07-04T05:19:02+5:302017-07-04T05:19:02+5:30

मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात १९ लाख ७० हजारांची रककम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या

A criminal offense against the builder of Thane | ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा

ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात १९ लाख ७० हजारांची रककम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
बिल्डर पटेल आणि कळवा येथील रहिवासी विनय कोचरेकर यांच्यात ११ ते २७ नोव्हेंबर २००९ या कालावधीत करार झाला होता. त्यानुसार कन्नमवारनगर येथील नव्या सदनिकेच्या किमतीतील १९ लाख ७० हजारांची रककम देण्याचे ठरले. त्यानुसार, अ‍ॅग्रीमेंटही करण्यात आले. या करारानुसार कोचरेकर यांनी काही रोकड आणि धनादेशाच्या स्वरूपात ही रककमही त्यांना दिली. परंतु, पटेल यांनी त्यांना गेल्या आठ वर्षांत कन्नमवारनगरात सदनिका दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत. वारंवार विचारणा करूनही त्यांनी पैसे परत न केल्याने कोचरेकर यांनी पटेल यांच्याविरुद्ध १ जुलै रोजी तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप रेग्युलेशन आॅफ दी प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन सेल (मोफा) या कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: A criminal offense against the builder of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.