साडेअठरा हजार शेतकऱ्यांना १०० कोटी ५६ लाखांचे पीककर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:07 AM2019-07-22T00:07:00+5:302019-07-22T00:07:24+5:30
ठाण्यासह पालघरच्या शेतकऱ्यांचा समावेश : ‘टीडीसी’चा पुढाकार
सुरेश लोखंडे
ठाणे : खरीप लागवडीसाठी शेतकºयांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील १८ हजार ५९५ शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामास अनुसरून १०० कोटी ५६ लाख ६४ हजार रुपयांचे पीककर्जवाटप केले आहे.
या दोन्ही जिल्ह्यांत १७ हजार ६०४.७० हेक्टर क्षेत्रावर यंदा भात, नागरी, वरी, सोयाबीन आदी खरीप पीक शेतकºयांकडून घेतले जात आहे. त्यासाठी लागणाºया बी-बियाणांसह कीडनाशक औषधी, खत आणि मशागतीस लागणाºया खर्चासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप पीककर्ज योजना लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील १९२ शेती संस्थांच्या माध्यमातून १० हजार ८५६ शेतकºयांच्या नऊ हजार ३७३.८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी कर्जवाटप झाले आहे. सुमारे ५२ कोटी ५५ लाख ५८ हजार रुपये या पीककर्जापोटी शेतकºयांना वाटप केल्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक पीककर्जपुरवठा शहापूर तालुक्यातील पाच हजार १३.१५ हेक्टरवरील पिकांसाठी करण्यात आला आहे. यामध्ये पाच हजार ४२४ सभासद शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना २५ कोटी ८७ लाख ८९ हजार रुपयांचे पीककर्ज मिळाले आहे. याखालोखाल मुरबाड तालुक्यातील तीन हजार २२३ शेतकºयांना १४ कोटी ५३ लाख, तर भिवंडी तालुक्यातील एक हजार ८६७ शेतकºयांना नऊ कोटी ९४ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्जवाटप झाले आहे. तर, सर्वात कमी ठाणे तालुक्यातील ३४ शेतकºयांना ३९.४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी केवळ २३ लाख ४३ हजार रुपये पीककर्ज मिळाले आहे.
पीककर्जापोटी वाटप केलेल्या १०० कोटी ५६ लाख रकमेपैकी ४८ कोटी रुपये पालघर जिल्ह्यातील शेतकºयांनादेखील शुक्रवारपर्यंत वाटप केले आहेत. या कर्जाचा लाभ सात हजार ७३७ शेतकºयांना झाला. त्यांच्या आठ हजार २३०.९० हेक्टरवरील खरिपाच्या पिकास अनुसरून बँकेने हा कर्जपुरवठा शेतकºयांना केला. या जिल्ह्यातील १७५ शेती संस्थांच्या नेतृत्वाखाली या शेतकºयांना कर्जपुरवठा झाला आहे.
सर्वात जास्त पीक कर्ज वाडा तालुक्यात मंजूर करण्यात आले आहे. या तालुक्यातील तीन हजार ३६० शेतकºयांना त्यांच्या तीन हजार ५९१.९० हेक्टरवरील पिकांसाठी २१ कोटी ६३ लाख ५६ हजार रुपये कर्जवाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पालघर तालुक्यातील २0६२ शेतकºयांच्या एक हजार ७१५ हेक्टरवरील पिकांसाठी ११ कोटी ३५ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. या जिल्ह्यात सर्वात कमी तलासरीतील ९९ शेतकºयांना त्यांच्या ११४.४० हेक्टरवरील पिकांसाठी ६६ लाख ९३ हजारांचे पीककर्ज मिळाले आहे.