ईदच्या निमित्ताने बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2015 11:00 PM2015-07-16T23:00:01+5:302015-07-16T23:00:01+5:30

दोन दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपल्याने शहरांतील बाजारात खरेदी करण्यासाठी मुस्लिम कुटूंबीयांची कोटरगेट, मंगळवार बाजार, तिनबत्ती व ठाणारोड या बाजाराच्या ठिकाणी गर्दी उसळली आहे.

The crowd gathered in the market on the occasion of Eid | ईदच्या निमित्ताने बाजारात उसळली गर्दी

ईदच्या निमित्ताने बाजारात उसळली गर्दी

googlenewsNext

भिवंडी : दोन दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपल्याने शहरांतील बाजारात खरेदी करण्यासाठी मुस्लिम कुटूंबीयांची कोटरगेट, मंगळवार बाजार, तिनबत्ती व ठाणारोड या बाजाराच्या ठिकाणी गर्दी उसळली आहे.
शहरांत सकाळी ११ वाजल्यापासून खरेदी करण्यास सुरूवात होते ती रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असते. या निमित्ताने चप्पल-बुटापासून कपडे व विविध दागीने खरेदी करतात. यासाठी शहरांत मंगळवारपासून सुरू झालेला बाजार ईदच्या सणापर्यंत सुरू रहाणार आहे. तसेच दररोज इफ्तारीसाठी लागणाऱ्या खाण्याच्या वस्तू व फळे यांचा बाजारही गेले महिनाभर मशिदीच्या बाजूला व ठिकठिकाणी लागलेला होता. ईद निमित्ताने बनविण्यात येणाऱ्या शिरकुरमासाठी लागणारे दुधाचा आजचा भाव ६६ रूपये होता. पुढे तीन दिवसांत हा भाव ७५ ते ८० रूपयांपर्यंत जाईल असा अंदाज रोजेकारांनी व्यक्त केला. सोन्याचा भाव कमी झाल्याचा फायदा उठवून श्रीमंत घरच्या महिलांनी दागिन्यांची खरेदी केली. या सणासाठी मुस्लिम समाजातील गरीबापासून श्रीमंतापर्यंतची कुटुंब घरांत लागणाऱ्या व दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व वस्तू आपापल्या ऐपती प्रमाणे खरेदी करीत आहेत. त्यासाठी बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळली आहे. ही गर्दी येथे चार दिवस रहाणार आहे.
ईदचा चाँद दिसल्यानंतर कोटरगेट मशिदच्या परिसरात मोठा बाजार भरतो. तेथे शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक रात्रभर खरेदी करीत असतात. (प्रतिनिधी)

Web Title: The crowd gathered in the market on the occasion of Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.