Gudi Padwa 2018 : पाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी ; फुले, तोरणे, श्रीखंड खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:34 AM2018-03-18T02:34:46+5:302018-03-18T06:26:35+5:30
चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या.
ठाणे : चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. पाडव्यानिमित्त सोने-खास करून वळे, नाणी खरेदीचे काऊंटर उघडणे, सोन्याच्या वस्तुंचे आदल्या दिवशी बुकिंग करणे यासाठी सराफी पेढ्यांत लगबग होती.
सर्वाधिक गर्दी होती, ती फुले, तोरणे खरेदीसाठी. त्यामुळे झेंडुचा भाव संध्याकाळनंतर वधारला. शिवाय कडुलिंबाची पाने, पावडर, त्याचा रसही खरेदी केला गेला. मिठाईच्या पदार्थांतही सर्वात जास्त भाव खाल्ला तो श्रीखंडाने. त्याच्या वेगवेगळ््या स्वादांनी. घरोघरी केल्या जाणाºया श्रीखंडासाठी चक्का खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर आमरस, बासुंदी, रबडी, गुलाबजाम, जिलेबी यांना मागणी होती.
उन्हाचा तडाखा सुरू असल्याने दुपारपर्यंत बाजारपेठेत फार गर्दी नव्हती. अपेक्षेप्रमाणे खरेदी होत नव्हती. पण संध्याकाळी उन्हे कलताच बाजारातील गर्दी वाढली. उत्साहही वाढला.
ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणजे जांभळी मार्केट, डोंबिवलीची मुख्य बाजारपेठे-स्टेशन परिसर, कल्याणला लक्ष्मी मार्केटचा परिसर येथे आंब्याचे डहाळे, साखरेच्या माळा, गजरे, झेंडूची फुले, चाफ्याची माळ, कडुलिंबाची पाने अशा नानाविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. काही आदिवासी महिलाही फुले, तोरणे विक्रीसाठी घेऊन आल्या होत्या. आंब्याचे डहाळे, कडुलिंंबाची पाने आणि चाफ्याची माळ १० रुपयांना एक याप्रमाणे मिळत होती. तर साखरेच्या माळा आकारानुसार २० ते ३० रुपयांना एक या दराने मिळत होत्या. फुले शुक्रवारपासूनच बाजारात आली असून केशरी व पिवळा झेंडू १०० रुपये किलोने मिळत असल्याचे वसंत पटहार या फुलविक्रेत्याने सांगितले. यंदा ठरावीक फुलांचेच गजरे विक्रीसाठी आहेत. जुई, चमेली, सायलीचे गजरे सिझनमुळे नसल्याचे दक्षा नालबन यांनी सांगितले. मोगरा, अबोली, चाफ्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपप्ट झाले होते.
मुहूर्ताच्या
आंबा खरेदीचा उत्साह
आंबा नुकताच बाजारात तोंड दाखवू लागल्याने त्यांचा भाव ८०० ते हजार रूपये डझन आहे. पण जय कुटुंबांत पाडव्याला पुजेसाठी किंवा नववर्षाच्या पहिल्या दिवशी आमरस खाण्याची पद्धत आहे, त्यांनी तेवढ्यापुरते आंबे खरेदी केले. त्याची खरेदी जास्त झाली नसली, तिचा मुहूर्त साधला गेला.