कसारा घाटात क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:09 AM2022-05-11T11:09:38+5:302022-05-11T11:10:29+5:30
Accident in Kasara Ghat : जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- शाम धुमाळ
कसारा : नाशिक-मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या पुढे असलेल्या वळणावर क्रूझरचा अपघात झाला. या मार्गावर जालनाहून मुंबईकडे जाणारी क्रूझर ही भरधाव वेगात घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर धडकली.
या अपघातात दर्शना विजय कांबळे (वय 11, रा. मंठा, जि.जालना) हिचा मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच, टोल पेट्रोलिंग टीम , महामार्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य घटनास्थली मदतीला पोहचले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे...
1) लिलाबाई लिंबाजी राठोड वय -30 वर्ष रा. मालेगाव
2) लिंबाजी राठोड वय-40 वर्षे रा .मालेगाव
3) विठ्ठल चव्हाण वय - 45 रा. वसई
4) जयश्री गजानन पवार वय -34 रा. वसई
5) अनवी गजानन पवार वय-1 वर्ष रा.वसई
6) कल्पना राजेश जाधव वय- 30 वर्ष रा. वसई
7) शामराव चव्हाण वय -60 वर्ष रा. वसई हे सर्वजण किरकोळ जखमी झाले