बेकायदा बांधकामे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:38 AM2018-11-17T05:38:56+5:302018-11-17T05:39:49+5:30
महिनाभरापूर्वी येथील कच्च्या व पक्क्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग समिती-६ अंतर्गत असलेल्या दाचकूलपाडा व मांडवीपाड्यातील सुमारे पन्नासहून अधिक बेकायदा बांधकामे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांच्या नियंत्रणाखालील पथकाने गुरुवारी जमीनदोस्त केली.
महिनाभरापूर्वी येथील कच्च्या व पक्क्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतरही बांधकाममाफियांनी तोडलेली बांधकामे पुन्हा बांधली. त्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्यानंतर त्यावर गुरुवारी पुन्हा बुलडोझर फिरवण्यात आला. यावेळी पन्नासहून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.
गरजूंना कमी किमतीत सुरुवातीला कच्च्या बांधकामांची घरे बांधकाममाफियांकडून बांधून दिली जातात. त्यासाठी दगडी बांधकामाचा पाया रचला जातो. त्यावर लोखंडी पत्रे व बांबूचे बांधकाम केले जाते. त्यांना वीज, पाणीपुरवठा केला जातो. बोअरवेल खोदल्या आहेत.