टंचाईवरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:58 PM2018-03-27T23:58:28+5:302018-03-27T23:58:28+5:30

महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Crushing from the scarcity | टंचाईवरून रणकंदन

टंचाईवरून रणकंदन

Next

उल्हासनगर : महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून २ ते ३ दिवस पाणी पुरवठा होतो. मग १६० एमएलडी पाणी जाते कुठे? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अखेर महापौर मीना आयलानी यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडवण्याचे आदेश कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.
शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एका हंडयासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. शहराला एमआयडीसीकडून एकूण किती एमएलडी पाणीपुरवठा होतो. याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत असेल तर, पाणी जाते कुठे? असा प्रश्नही आयुक्तांना विचारला.
शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशांत, सुनील सुर्वे, धनंजय बोडारे, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, डॉ. प्रकाश नाथानी, जमनुदास पुरस्वानी, विजय पाटील, साई पक्षाचे टोणी सिरवानी, काँगे्रस पक्षाच्या अंजली साळवे, राष्ट्रवादीच्या सतरामदास जेसवानी आदींनी पाणीप्रश्नी कार्यकारी अभियंता सेलवण व युवराज भदाणे यांना धारेवर धरले.
माणशी १३५ लिटर तर शहराच्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाणी पुरसे आहे, असे सेलवण यांनी सांगितले. मात्र जुनी-नवी जलवाहिनी, पाणी गळतीमुळे शहराला दरदिवशी १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो.
४० ते ५० एमएलडी जादा पुरवठा होऊनही टंचाई निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर जेसवानी यांनी शहराला पाणीपुरवठा
करणाºया मुख्य जलवाहिनीला मीटर नसल्याने शहराला किती एमएलडी पाणी पुरवठा होतो याबाबत अनिश्चिता आहे.
महापालिका पाण्याचे जादा बिल देत असल्याचा आरोपही जेसवानी केला.
महासभेत पाणीटंचाईवरून एकच गोंधळ झाल्याने, ज्या नगरसेवकांच्या प्रभागात पाणी नाही त्यांना उभे राहण्यास सांगितले. सर्वच नगरसेवक उभे राहिल्याने, महापौरही अवाक झाल्या. अखेर प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.

Web Title: Crushing from the scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.